जनतेज न्युज

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गोर गरिबांना मोठ्या प्रमाणावर छळलजातंय.

प्रतिनिधी , मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गरिबांना छळलं जात आहे. कामगारांच्या विरुद्ध सरकार कायदे करीत आहे. कामगारांच्या विरुद्ध कायदे केले जात आहेत, देशातील शेतकऱ्यांचे वाटोळं होईल अशा प्रकारचे कायदे त्यांनी केले आहेत. मात्र त्यांना बंगाल मध्ये होऊ घातलेल्या मतदानाची पडली आहे,कोरोना काळात छोटे दुकानदार उध्वस्त झाले आहेत,सर्वसामान्य माणसांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.पेट्रोल गॅस च्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. काही मोठ्या उद्योगपतींना आर्थिक लाभ व्हावा म्हणून मोदी सरकार मदत करत आहे.म्हणून महाआघाडीच्या माध्यमातून आज निदर्शने करण्यात आले.