प्रतिनिधी , वाशिम : जिल्ह्यातील ग्राम पंचायतिच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच पक्ष स्थानिक राजकारणात आपले वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी ह्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्राम पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकावा या साठी मोर्चे बांधणी करण्यास वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या मध्ये त्या सर्व पदाधिकारी-शाखा प्रमुख- बूथ प्रमुख यांच्या बैठका घेत आहेत.गाव पातळीवरील प्रत्येक सेनेच्या कार्यकर्त्याला निवडणुकीत कार्य करण्यासाठी बैठकीत ऊर्जा देत आहेत…..
