जनतेज न्युज

मला ईडीची नोटीस मिळाली – एकनाथ खडसे

प्रतिनिधी , जळगाव : भाजपतून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ईडीच्या नोटीस संदर्भात काहीही माहिती नाही. कन्फर्म झाल्यावर सांगतो, असे सांगत एकनाथ खडसे यांनी सविस्तर बोलण्यास नकार दिला आहे.
पुण्यातील भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ईडीने एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली असून, चौकशीसाठी बुधवारी (30 डिसेंबर) हजर राहण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याने ईडीने खडसेंना नोटीस बजावल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी खडसेंची चौकशी होण्याची शक्यता आहे. असे असताना एकनाथ खडसे यांनी मात्र, आपल्याला कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले आहे व बोलणे टाळले.