जनतेज न्युज

नागपूर महानगर पालिकेतील पदाधिकारी आणि अधिकारी या मधील संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता..?

प्रतिनिधी , जळगाव : आयुक्त विकास कामांना प्रशासकीय मान्यता देत नसल्याने शहरातील 200 कोटी पेक्षा अधिक चे विकास काम ठप्प झाल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी केला आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत देखील आयुक्त राधाकृष्णन बी हे गैरहजर होते. त्यामुळे आजची बैठक उद्या पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राज्य सरकार आयुक्तांच्या मार्फत महानगर पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा संशय देखील स्थायी समिती अध्यक्ष झलके यांनी व्यक्त केला. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे विषय असताना आयुक्त मुंबईत बैठक असल्याचं कारण देत मुंबईत गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थित या विषयांवर चर्चा शक्य नसल्याने बैठक उद्या पर्यंत स्थगित केली आहे. मात्र आयुक्त जर राज्य सरकारच्या इशाऱ्यावर विकास कामं स्थगित करत असतील, तर इथून पुढे काय भूमिका घ्यायची हे ठरवू. असा इशारा देखील झलके यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. त्यामुळे इथून पुढे नागपूर महानगर पालिकेत आयुक्त विरुद्ध सत्तापक्ष असा सामना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.