जनतेज न्युज

उद्या होणाऱ्या ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मद्यपान करणारावर पोलीसांकडून कारवाई ला सुरवात.

प्रतिनिधी , ठाणे : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी ३० डिसेंबरपासून कारवाई सुरू केली आहे. . ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरसह ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारून प्रत्येक वाहनचालकाची तपासणी केली जाणार आहे. मोटार वाहन कायद्यान्वये केवळ मद्यपी वाहनचालकच नव्हे तर, वाहनांतील सहप्रवासीसुद्धा दोषी ठरतात. यंदा त्यांच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुणीही मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक विभागाचे केले आहे.
कोरोना संक्रमणाचा धोका असल्याने . ब्रेथ एनलाइजरच्या सहाय्याने करण्यात येणारया तपासणीत प्रत्येक वाहन धारका साठी नवीन नोजल चा वापर केला जात आहेत . ५ जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू असल्याने हाँटेल, बार आणि अन्य ठिकाणी रात्री ११ नंतर पार्ट्यांवर बंदी आहे. यामुळे कोणीही मद्य पीऊन गाडी घेऊन बाहेर पडुनये असे आवाहन पोलीसानी केले आहे