प्रतिनिधी , भुसावळ – भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपालिकेला 25 कोटी चा निधी 24 तास पाणीपुरवठ्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मंजूर केला होता. त्या निधीपैकी सव्वा दोन कोटी निधी नगरपालिकेच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्याने या योजनेला स्थगिती दिली व ही योजना थांबली. वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे हे स्थगिती उठवण्यासाठी कोर्टामध्ये ही गेले.
कोर्टाने स्थगिती उठवली परंतु ही योजना अद्यापही सुरू झाली नाही. योजना सुरू करण्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरणगाव मध्ये रस्ता रोको, एक दिवशी उपोषण, जलसमाधी आंदोलन करण्यात आले तरीही प्रशासनाला याची जाग आली नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक 13 जानेवारी रोजी हंडा मोर्चा, एल्गार मोर्चा नगरपालिकेवर करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली आहे.
