जनतेज न्युज

भोकरदन तालुक्यातील चांधाई एको ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

प्रतिनिधी , जालना- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांधई एको येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एका बैठकीत घेतला आहे. यासाठी त्यानी ११ सदस्यांची बिनविरोध निवडसुध्दा केली आहे. यावर ४ जानेवारी रोजी अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. चाधई एको येथील ग्रामस्थांनी शनिवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह नागरिकांची बैठक घेतली असुन यावेळी कैलास पुंगळे यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. यामुळे गावच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे ग्रामस्थांकडुन सांगण्यात आले आहे.