जनतेज न्युज

औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक लवकरच घेऊ-महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

औरंगाबाद- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहराती गांधी भवनात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी, राज्यामध्ये महाआघाडीचा सरकार आलं आणि मार्च महिन्यात लॉकडाउनचा कालखंड सुरू झाला. या सर्व कालखंडामध्ये निवडणुका थांबवण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा आता नवीन वर्षात घेतल्या जाणार असुन महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका या निवडणुका येऊ घातल्या आहेत. आणि आता सर्व गोष्टीचा विचार करून औरंगाबाद महानगरपालिकेचे निवडणूक सुद्धा लवकरच होणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

एकंदर सर्व गोष्टीचा विचार करता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही किमान समान कार्यक्रमावर एकत्रित काम करत आहोत. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय चांगल्या पद्धतीने राबवला असुन दोन लाखाचं कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये गेलं असल्याचं त्यानी सांगीतलं.