जनतेज न्युज

उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ कर्मचांऱ्यांचे काम बंद आंदोलन

प्रतिनिधी , जालना- बीड येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपीक अमर सोळंके यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. तसेच शिवीगाळ करण्यात आली. सदर उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, कर्मचारी संघटनेतर्फे या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. तेथील मुख्य लिपीक श्रीमती विश्वा राऊत या महिला कर्मचाऱ्यांना त्यांना असभ्य अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यात आली. उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे. उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, बीड येथे कर्मचा-यांवर वारंवार हल्ले होत असुन शिवीगाळ करण्यात येत असण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत शासनाने संरक्षण दयावे म्हणून औरंगाबाद विभागांतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना येथील कर्मचाऱ्यांद्वारे
गुरूवार रोजी कामकाज बंद करुन जाहीर निषेध करण्यात आला आहे.