प्रतिनिधी , औरंगाबाद- शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी प्रादेशिक सहसंचालक, औरंगाबाद या कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घोषणा देऊन आपला राग व्यक्त केला. या आंदोलनात उसाला रास्त भाव मिळावा म्हणून घोषणा देण्यात आल्या, त्या सोबतच केंद्र सरकारने केलेले कायदे रद्द करा. 265 जातीच्या ऊसाची नोंदणी करा. ऊसाला पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने भाव द्या. अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता. अधिकाऱ्यांनीही आंदोलकांचे म्हणणे ऐकुन योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
