प्रतिनिधी , राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे 4 वाजता एपीएमसी मधील भाजी व फळ मार्केट चा दौरा केला. यावेळी आमदार रोहित पवार एपीएमसी मधील व्यापारी तसेच काही शेतकऱ्यांशी चर्चा करत एपीएमसी मधील यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये नव्या कृषी कायद्यामुळे चिंतेचे वातावरण असून केंद्राने राज्य सरकार ला विश्वासात न घेता नवा कायदा लादला असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी व्यक्त केलेय. एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार होत असून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे लरशन सरकार पर्यंत पोहचविणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिलेय.
