जनतेज न्युज

आकस बुद्धीने ठाकरे सरकारने ‘हा’ निर्णय घेतला आहे – आमदार गोपीचंद पडळकर

प्रतिनिधि , सांगली : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार असून राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांच्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही सरकारकडून कपात करण्यात आली आहे.

याविषयी बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.यावर त्यांनी, ‘महाविकास आघाडी सरकारला मुळातच देवेंद्रजी फडणवीस यांची लोकप्रियता खुपत आहे.त्यामुळे, आकस बुद्धीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. देवेंद्रजींच्या सोबत या महाराष्ट्रातील पीडित,उपेक्षित,गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत व तेच त्यांचे सुरक्षा कवच आहे. त्यांना या सुरक्षेची मुळातच गरज नाही. जे लोक घराभोवती सुरक्षा घेऊन घरात बसले आहेत त्यांची सुरक्षा काढण्याची खरी गरज आहे. महाविकास आघाडी कपटनितीने व सूडबुद्धीने हा निर्णय घेतंय हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येतंय, असं मत व्यक्त केले आहे.