जनतेज न्युज

मतदारांनी दिली युवा चेहऱ्याला पसंती ; कमी वयात वृषाली पुरी विजयी

प्रतिनिधी , यवतमाळ : प्रस्थापित उमेदवारांना धोबीपछाड देत मतदारांनी युवा चेहऱ्याला पसंती दिल्याचे चित्र बघायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीत वृषाली पुरी निवडून आली आहे.

गावविकास करायचा असेल तर प्रस्थापित चेहऱ्याला नाकारले पाहिजे असा चंग मतदारांनी बांधला होता. या निवडणुकीत वृषाली पुरी प्रथम उभी राहिली आणि निवडून आली. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेली ती कमी वयाची सदस्य आहे. गावाचा सर्वांगीण विकास करायचा आहे असे तिने सांगितले.