प्रतिनिधी , नागपूर : महाविकास आघाडी सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात संपूर्ण राज्यात भाजपा महिला आघाडी आंदोलने करत आहे. नागपूरच्या संविधान चौकात भाजपा महिला आघाडी तर्फ़े धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धनंजय मुंडे यांच्या विरोधात नारे देण्यात आले व त्यांनी राजिनामा द्यावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडी नागपूर शहराध्यक्ष नीता ठाकरे यांनी केली
