जनतेज न्युज

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अर्णव गोस्वामी च्या कथित लिक झालेल्या चॅट संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेय.

प्रतिनिधि , अर्णव च्या संभाषणाची चौकशी होणं अत्यंत आवश्यक असून एयर स्ट्राईक हा कॉन्फिडेंशल होता त्यामुळे गोसावी ने असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे आठवले यांनी म्हंटलंय. आधी माहिती भेटली हे सांगणे म्हणजे सौरक्षण खात्यावर संशय व्यक्त केल्यासारखं आहे. हे संभाषण अतिशय गंभीर बाब आहे त्यामुळे याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं असल्याचे मत आठवलेंनी व्यक्त केलेय. मात्र शेवटी चुकीच्या पद्धतीने याला हायलाईट करण्यात येत असून अर्णव गोस्वामी चा यात संबंध नाही असे देखील आठवलेंनी नवी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.