जनतेज न्युज

​​अर्णव गोस्वामीविरोधात धुळ्यात काँग्रसचे जोरदार आंदोलन.

प्रतिनिधी , धुळे : अर्णव गोस्वामी हाय हाय, देशदोही अर्णव गोस्वामी ला अटक करा​,​ अटक करा अर्णव गोस्वामीला अटक करा. अशा घोषणा देत धुळे जिल्हा काँग्रेसने अर्णव गोस्वामीच्या विरोधात घोषणाबाजी करत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढणार्‍या अर्णव गोस्वामी याच्याविरोधात देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज धुळ्यातील जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अर्णव गोस्वामी यांनी देशातील फार मोठा देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. अश्या गोस्वामी सारख्या नालायक माणसाला पाठीशी घालणाऱ्या देशातील गद्दार मंत्र्यांनी देखील त्याला वाचवण्या साठी सर्व सीमा पार केल्या आहेत, अशी संतापजनक प्रतिक्रिया यांनी यावेळी दिली. तसेच अर्वब गोस्वामी याला अटक करण्यासाठी आणि तसेच देशाची गोपनीय माहिती देणार्‍या व्यक्तीचे ​नाव जाहीर करावे यासाठी आज धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करीत गोस्वामी चा निषेध केला.