प्रतिनिधी , सक्षम 2021 या राष्ट्रीय कार्यक्रमाची ची सुरवात 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी राबवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संपूर्ण देसहत भारत सरकार द्वारे राबवण्यात येणार असल्याची माहिती भारत पेट्रोलियम चे सेल्स मॅनेजर अमित कुमार रॉय यांनी आज धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमात जीवाश्म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढते ओझे कमी करणे आणि जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्यक्रमाचे महत्वाचे उद्देश आहे. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयक यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम नागरिकांना मध्ये जनजागृती करण्यासंबंधित केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने महाराष्ट्रात विविध उपक्रम राबविन्यात येणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.
