प्रतिनिधी , अमरावती : देशात ज्या गोष्टि गोपनीय राहिला पाहिजे त्या राहत नाही,त्या साठि अर्णव गोस्वामि हे देशात उदाहरण आहे. गोपनीय गोष्टीची इन्फॉर्मेशन वापरून त्या ठिकाणी राजकारण होत आहे, त्यामुळे अर्नब गोस्वामी यांना अटल झाली पाहिजे अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली, यां मागणी साठि अमरावती काँग्रेस च्या वतीने अमरावतीच्या इर्विन चौकात एक दिवशीय धरने देण्यात आले. एकीकडे सेंट्रल गव्हर्नमेंट शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याच्या मार्गावर आहे, अर्नब गोस्वामी सारखे खरोखरचे देशद्रोही आहे हे सरकारला का दिसत नाही ?त्यामुळे गोस्वामी यांना अटक झाली पाहीजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी भाष्य केले पाहिजे, व या देशद्रोह्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी या धरणे आंदोलनात यशोमती ठाकूर यांनी केलि
