जनतेज न्युज

गुगल सीईओ सुंदर पिचाईंकडून भारताला ५ कोटींची मदत

प्रतिनिधी , मुंबई :- कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे भारतात विविध प्रकारची संकटे उभी राहिली आहेत. सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यातदेखील झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. यानंतर सर्व जण आपापल्या परीने मदत करत आहेत. आता जगातील सर्वात मोठ्या आणि आघाडीच्या गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारताला करोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत मोठी मदत केली आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी करोना आपत्तीविरुद्धच्या लढाईत गिव्ह इंडियाला पाच कोटी रुपये दान केले आहेत.
गिव्ह इंडियाने यासंदर्भात ट्वीट केले आहे. करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात संकटात अडकलेल्या मजूरांच्या कुटुंबियांसाठी रोख रक्कम म्हणून गुगलकडून पाच कोटी रुपये देण्यासाठी सुंदर पिचाई तुमचे धन्यवाद!

सुंदर पिचाई यांच्याकडून ही मदत देण्याआधी गुगलने करोनाग्रस्तांसाठी ८० कोटी डॉलर्सची मदत करण्याची घोषणा केली होती. यात स्वयंसेवी संस्था आणि बँकांसाठी २० कोटी डॉलर देण्याचा समावेश होता. यामुळे छोट्या उद्योजकांना आर्थिक मदत केली जाईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.