प्रतिनिधी , नंदुरबार : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा यांच्या वतीने आज नंदुरबार येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गेल्या 72 दिवसापासून दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी विरोधी तीन काळे कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत त्यांच्या मागण्या मान्य न करता आंदोलनकर्त्यांवर पाण्याचा फवारा अश्रू धूर व लाठीहल्ला करून दडपशाही पणा केंद्र सरकारने सुरू केला आहे त्याबद्दल केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्याकरता आज नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन च्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने जर शेतकरी विरोधी तीन काळे कायदे मागे घेतले नाही व किसान आंदोलकांवर केलेल्या खोट्या केसेस मागे घेतले नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य शेतमजूर यूनियन ,लाल बावटा चे राज्य उपाध्यक्ष नथू साळवे यांनी सांगितले यावेळी आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे नाना ठाकरे, हिराबाई पवार,उमाकांत पाटील आदी उपस्थित होते….
