2014 सालच मोदींच सरकार सहा चाकी होतं आत्ता एक एक चाक कमी होत चाललेत …नाना पाटोले
मला खुर्चीचा मोह नाही….नाना पाटोले
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : आज काँग्रेस चे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले विविध उद्घाटन निमित्त कल्याणात आले होते .यावेळी पत्रकारांशी बोलताना पाटोळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली .यावेळी बोलताना पाटोळे यांनी अमित शहा यांच्या दौऱ्या नंतर देशात सत्ता बदलेल असे चित्र निर्माण केलं जातंय मात्र महाराष्ट्रातली सत्ता बदलणार नाही असा आमचा पूर्ण विश्वास आहे .
एल्गार परिषदेतील वक्तव्याबाबत बोलताना पाटोळे यांनी कुठल्याही धर्माबाबत कोणालाही टीका करण्याचा अधिकार नाही जे केले ते चुकीचे आहे याबाबत आम्ही तक्रार केल्याचे स्पष्ट केलं .
तर शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटीच्या ट्विट बाबत बोलताना पाटोले यांनी पुन्हा केंद्र सरकारला लक्ष केलं ,एक काळ असा होता की सेलिब्रिटींना भाई लोकांची भीती होती ,आता सेलिब्रिटींनी ट्विट केले ते केंद्र सरकारच्या दबावाखाली ट्विट केल्याचा आरोप यावेळी केला .
आजच्या दौऱ्यात अमित शहा यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना 2014 सालच मोदींच सरकार सहा चाकी होतं आत्ता एक एक चाक कमी होत चाललेत, बेइमानी कोण करतय हे देशातील लोकांना समजते ,उद्धव ठाकरे यावर त्यांना उत्तर देतील अस सांगितलं .
.पुढं बोलताना मला खुर्चीचा मोह नाही ,खुर्ची माझ्या मागे धावते मी खुर्चीच्या मागे धावत नाही ,राज्यात काँग्रेसला एक नंबर वर आणून महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट केलं
