प्रतिनिधी , मुंबई : गेल्या दोन आठवड्यांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे.मात्र,या शिक्षकांना कोणत्याही प्रकारचा न्याय अजून मिळालेला नाही.आज याच शिक्षकांनी न्याय मिळावा म्हणून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याकडे धाव घेतली.यावेळी पोलिसांनी या शिक्षकांना अडवलं.मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळाची बैठक असल्याने वर्षा गाईकवाड त्या बैठकीमध्ये असल्याने त्या या शिक्षकांना भेटू शकल्या नाहीत.दरम्यान एका महिला शिक्षिकेला चक्कर आल्याने येथील वातावरण भीतीदायक झाले होते.
