जनतेज न्युज

आज शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन

प्रतिनिधी , आज शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.याकरिता जुन्नर मधील शिवनेरी गडाच्या पायथ्याशी अभूतपूर्व असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नागरिकांनी इथे गर्दी करू नये याकरिता १४४ कलम लागू करण्यात आले आहे.दरम्यान राज्यभरातून आलेले शिवभक्त गडाच्या पायथ्याशी थांबून तेथूनच दर्शन घेऊन मार्गस्थ होताना दिसत होते.काल रात्रीपासूनच राज्यभरातील शिवप्रेमी मशाली घेऊन आपापल्या गावी जातानाचे दृश्य दिसत होते…एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवजयंती सोहळा हा जुन्नर मधील शिवनेरी किल्ल्यावर प्रथमतःच अशा साध्या पद्धतीने साजरा करावा लागत असल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी दिसून येत आहे.