प्रतिनिधी , जळगाव : तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपालिकेसाठी 25 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केले होते परंतु महा विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या सरकारने या योजनेला मस्त किती दिली होती त्यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष सुनील काळे न्यायालयामध्ये गेलते न्यायालयाने स्थगिती उठवली तरीदेखील पंचवीस कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेला सुरुवात झाली नव्हती म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्ता रोको जलसमाधी आंदोलन व नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला होता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दखल घेत ठेकेदारास वर्क ऑर्डर देण्याचे आदेश दिले वर्कऑर्डर ठेकेदारास देऊन एक महिना झाला आहे तरीदेखील ठेकेदार कामास सुरुवात करत नाही म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरणगाव नगरपालिकेवर ती जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा मोर्चा पिण्याच्या पाण्यासाठी काढण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली आहे
