जनतेज न्युज

२ कुलगुरूंनी राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे राजीनामा दिला असा गैरसमज पसरवला जातोय-उदय सामंत

प्रतिनिधी , मुंबई : आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. पहिला दिवस हा श्रद्धांजलीपर प्रस्तावासाठी मर्यादित असल्याने आज विधानसभेचे काम अवघ्या दोन तासात समाप्त झाले.या दरम्यान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी २ कुलगुरूंनी दिलेल्या राजीनाम्यावर भाष्य केले.यावर बोलताना,दोन कुलगुरूंनी राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे राजीनामा दिला असा गैरसमज पसरवला जात आहे’,असे मत व्यक्त केले.
याचसोबत,’जर कुलगुरूंनी राजकीय हस्तक्षेपामुळे राजीनामा दिला असता तर त्यांनी राज्यसरकारचे कौतुक केले नसते’,असे मत मांडले.
नेमके घडले काय?
काही दिवसांपूर्वी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, जळगावचे कुलगुरू पी पी पाटील यांनी वैयक्तिक कारण देत राजीनामा दिला.यानंतर लगेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू रिटर्न शास्त्री यांनी राजीनामा दिला.यामुळे राजकीय क्षेत्रात हा मुद्दा वादाचा ठरला.यावरून आता विरोधक सत्ताधाऱ्यांवर टिकेच्या फैरी झाडत आहेत.