प्रतिनिधी , कोल्हापूर : 8 मार्चला मराठी भाषिकांचा मोर्चा बेळगाव मध्ये मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी दिली आहे. या मोर्चामध्ये कोल्हापूर शिवसेना सहभागी होणार आहे. अशी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिली आहे. वादग्रस्त झेंडा विरोधात मराठी भाषिकांचा मोर्चा आहे. बेळगाव महापालिकेसमोर हा लाल पिवळा झेंडा लावण्यात आला आहे. वादग्रस्त झेंडा काढण्यासाठी मराठी भाषिक आठ मार्चला रस्त्यावर उतरणार आहेत.
