प्रतिनिधी , मुंबई : रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त आज त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आधारआश्रम ट्रस्ट या संस्थेतील राज्यातील आत्महत्याग्रस्त शतकऱ्यांच्या मुलींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानभवनात राखी बांधली.
यावेळी त्यांच्याकडून राखी बांधून घेताना पुन्हा अशी वेळ कोणत्याही भगिनीवर येऊ नये यासाठी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र घडवणे ही या युती सरकारची प्राथमिकता असून त्या दिशेने पावले उचलायला सरकारने सुरुवात केलेली आहे. ज्या दिवशी या राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबून तो सुजलाम सुफलाम होईल तीच या भगिनींना दिलेली खरी ओवाळणी ठरेल, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
