जनतेज न्युज

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी समाजाने महात्मा ज्योतिबा फुले चौकातून काढली रॅली

प्रतिनिधी , औरंगाबाद : शहरातील औरंगपुरा परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले येथून आज जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी समाजाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली होती यामध्ये बिरसा मुंडा यांचा सजीव देखावा करण्यात आला होता. आदिवासी समाजाच्या विविध नृत्य व विविध वाद्यांसह ढोल ताशांच्या गजरात ही भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवण ूक औरंगपुरा मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक भडकल गेट आणि इथून आमखास मैदान या ठिकाणी निरोप समारंभ करण्यात आला आहे. यावेळी आदिवासी समाजाच्या वतीने विविध आदिवासी गीत नृत्य आणि सजीव देखाव्यासह ही रॅली काढण्यात आली रॅली पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यामध्ये आदिवासी समाजाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदरील रॅली आज रोजी शहरात संपन्न झाली आहे.