जनतेज न्युज

ठाण्यात ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा महाप्रबोधन यात्रेच्या पहिल्याच मेळाव्याला तुफान गर्दी

प्रतिनिधी, ठाणे : शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह गोठवळ्यांतर दुसरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात गद्दारी केल्याची चांगलाच समाचार घेण्यात आला. शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून झाली असल्याने पहिल्याच मेळाव्याला कार्यकर्त्यानी तुफान गर्दी पाहायला मिळाली. या मेळाव्याला शिवसेना नेते भास्कर जाधव,शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे आणि धर्मराज्य पक्षाचे राजन राजे यांनी जोरदार भाषण केली.