प्रतिनिधी, अमरावती : अभिजीत अडसूळ यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार रवी राणांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिन्ही पक्षाचा आम्हाला पाठिंबा आहे. अडसूळ यांनी केलेल्या दाव्याला काही अर्थ नाही. केंद्रात नवनीत राणा यांनी पाठींबा दिला. राज्यात मी सरकारला पाठिंबा दिलाय. त्यामुळे अमरावती लोकसभा निवडणूकीत नवनीत राणा निवडणूक लढतील आणि अभिजित अडसूळ व आनंदराव अडसूळ हे त्यांचा प्रचार करतील. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा प्रचार करतील त्यामुळे कोणी कितीही दावे केले तरी त्याला काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे.
