प्रतिनिधी, वर्धा : सावंगी (मेघे) वर्धा येथील हद्दीतील सर्व असंघटीत कामगार/मजुर / आदी मागील २५ ते ३० वर्षांपासून किरायेदार / भाडेकरू लोकांना हक्काचे शासकीय जमीनीवर पट्टे / जमिन / घरकुल सह कायदेशिर पक्के घर बांधून मिळावे यासाठी आज आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या निवासस्थानी भव्य मोर्चा काढण्यात आला. २०२२ ला आयोजित पंधरवाडा सप्ताह, विकास पवन येथे निवेदन देण्यात आले होते. परंतु या बाबत काहीही करण्यात आले नाही. लाभार्थ्यांना शासकीय जागेवर जागेचे पट्टे तसेच त्यांना पक्के घर बांधून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
