प्रतिनिधी, बुलडाणा : अनेक भाविक श्री संत गजानन महाराज शेगाव येथे दर्शनाला विविध प्रकारच्या वाऱ्या हे करत असतात. तर विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे देशातील कानाकोपऱ्यातून भक्त दर्शनाला येत असतात. याच प्रकारे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथून चौघे डॉक्टर दिनाच्या निमित्ताने 315 किलोमीटरचा प्रवास करीत चौघांनी “देखना है कल, तो चलाओ साईकल” चा नारा देत शेगाव गजानन महाराजांच्या दर्शनला येथे दाखल झाले आहेत.
