प्रतिनिधी, सातारा : राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी 30 आमदारांना घेऊन भाजप शिवसेनेच्या सत्तेला पाठींबा देत त्यांच्या सोबत सत्तेत बसण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी सातारच्या कराड उत्तरचे आ.बाळासाहेब पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मी साहिबांचा निष्ठावंत असून मी त्याच्याबरोबर राहणार असल्याचे मत बोलताना व्यक्त केले आहे
