जनतेज न्युज

आमित ठाकरे यांच्या उपस्थिती मध्ये ४५० कार्यकर्त्यांना मनसेत पक्षप्रवेश

प्रतिनिधी, संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील तापडिया नाट्यमंदिर येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना युवा सेनेच्या वतीने मराठवाड्यातील काही पदाधिकाऱ्यांना नियुक्त व पक्षप्रवेश करण्याचे आयोजन करण्यात आले. आज मनसे युवा अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले, यावेळी जालना नांदेड परभणी हिंगोली बीड उस्मानाबाद या ठिकाणाहून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमित ठाकरे यांच्या हस्ते ४५० कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश व नियुक्त्य करण्यात आले.