प्रतिनिधी, संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात आज सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस होऊन नाला भरून वाहत असताना गुडघ्या एवढे पाणी काही कॉलनी व रस्त्यावर साचले होते. तेथील ड्रेनेजचे झाकण उघडून पाणी जाण्यासाठी मोकळा मार्ग नागरिकांनी करून दिला,सध्या शहरातील रस्ते हे सिमेंट रस्ते झाल्यामुळे काही नागरिकांची घरे हे रोडच्या खाली असल्यामुळे घरातही पाणी शिरल्याचे नागरिकांनी सांगितले.
