जनतेज न्युज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीतूनच उभा राहिला असून हा कुठलाही राजकीय भूकंप नाही – आमदार अनिल गोटे

प्रतिनिधी, धुळे :  आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मात्र यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी हा कुठलाही राजकीय भूकंप नसून भूकंप तूनच सुनामी येण्याआधी त्याची चाहूल लागत नाही, मात्र हे होणार असल्याची पूर्वकल्पना आधीच होती. तसेच राष्ट्रवादी पक्ष हा फुटीतूनच उभा राहिला आहे. अशी प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी व्यक्त केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना याबाबत आम्ही काय कल्पना देणार, त्यांना कल्पना देणे म्हणजे मुलाने वडिलांना शिकवण्या सारखे झाले असून याचे केंद्रबिंदू शरद पवारच असल्याची प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी व्यक्त केल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच विरोधी पक्षांचे राजकारण हे अतिशय गलिच्छ असून आजच्या राजकारणात फक्त दोनच पर्याय शिल्लक आहेत एकतर आमच्याकडे या किंवा जेलमध्ये जा, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत अनिल गोटे यांनी भाजपवर निशाणा साधला. आपण कुणासोबत जाणार याबाबत अनिल गोटे यांना विचारणा केली असता त्यांनी आम्ही मूळ पक्षासोबत जाणार असल्याचे सांगत एक प्रकारे शरद पवारांसोबतच असल्याची प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी व्यक्त केली.