प्रतिनिधी, बुलडाणा : ज्या दहशतवाद्याने मुंबईच्या लोकांच्या देहाच्या चिंधड्या उडवल्या त्याची कबर सजविने ही सर्वात खेदाची व मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि ज्या सरकारच्या काळात हे झालं म्हणून मला वाटत की आम्ही जे 40 आमदार वेगळे झाले , आम्ही हाच विचार मांडायचो की , काँग्रेस ही दशद्रोह्यांचं समर्थन करणारी पार्टी आहे. राष्ट्रवादी चे नेते नवाब मलिक याचे दाऊद शी संबंध आहे ते ही देशद्रोही आहेत.आणि अशा प्रकारे बाळासाहेबांना अस कधीही अभिप्रेत नव्हतं. जर बाळासाहेब जिवंत असते आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री असते तर ही कबर बाळासाहेबांनी ठोकरेंनी उडविली असती. अशा प्रकारे देशद्रोहाच्या कबरेला कधीच सजवली गेली नाही पाहिजे ही बाळासाहेबांनी भूमिका घेतली असती. आपण पाहिलं की लादेन मारला तर त्याला समुद्रात फेकलं.अफजल गुरूला तुरुंगातच दफन केलं. पण अशा प्रकारे जर कुणी कबर सजविली असेल तर त्याच्यावर कारवाई करून त्याला देशद्रोही घोषित केलं पाहिजे.
