जनतेज न्युज

एपीएमसी पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना केले जेरबंद

प्रतिनिधी, नवी मुंबई : एपीएमसी आवारात पादचाऱ्यांना लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एकाला रंगेहात पकडण्यात आले असून, इतर दोघांना तपासादरम्यान शोध घेत पकडण्यात यश आले. आरोपींकडून लुटीचे चार गुन्हे उघड झाले असून अजूनही काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून एपीएमसी आवारात जबरी चोरीचे गुन्हे घडत आहेत. पादचारी व्यक्तींना अडवून मारहाण करून मोबाइल आणि इतर ऐवज चोरण्यात येत होते. अश्याच जबरी चोरी दरम्यान एका आरोपीला पकडण्यात यश आले तर दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. एपीएमसी पोलिसांनी शोध घेत दुसऱ्या आरोपिलाही अटक केली. तर कोपरी सिग्नल परिसरात गाडी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या एका आरोपीला देखील पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली.