जनतेज न्युज

आश्रम शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडल्याने 8 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, येळगाव येथील घटना

प्रतिनिधी, बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील येळगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या 8 वर्षीय रोशन रमेश दुबे या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर खेळत असताना लोखंडी गेट पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. जखमी अवस्थेत रोशनला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केलेय. मृत रोशन रमेश दुबे हा मध्यप्रदेश मधील खांडवा जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील निसखेडी या गावातील रहिवासी असून तो येळगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत शिकतोय. आज शनिवार असल्याने मुलांना खेळण्यासाठी शाळेच्या आवारात सोडलेले होते. यावेळी रोशन शाळेच्या लोखंडी गेट ला धरून खेळत असताना अचानक लोखंडी गेट त्यांच्या अंगावर पडले, तो गंभीर जखमी झाला मात्र रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. बुलडाणा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून बुलडाणा पोलिसात मर्ग न.56/22 कलम 174 नुसार आकस्मिक मृत्यू ची नोंद केलीय.