प्रतिनिधी, औरंगाबाद : शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की मी नेहमीच शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम केले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा ठराव महानगरपालिकेत मी मांडला होता. मात्र सदरील स्मारकाचे उद्घाटन करताना साधे निमंत्रण पत्रिका ही मला देण्यात आली नाही. माझ्या परिसरात कोणत्याच प्रकारचे विकास कामे होत नव्हते या सगळ्या राजकारणाला मी वैतागलो होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला वेळोवेळी माझ्या परिसरासाठी यांनी वाट साठी मोठा निधी दिला रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला.
हे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्याकडून होत नव्हते. राजकारणामध्ये मला डावण्याचा प्रयत्न करेन दानवे यांच्याकडून नेहमी होत होता. त्यामुळे औरंगाबादच्या विकासासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालो आहे असे शिवसेनेतून हकालपट्टी झालेले राजेंद्र जंजाळ यांनी पत्रकार परिषदेत आज रोजी माहिती दिली आहे सदरील पत्रकार परिषद आज रोजी संपन्न झाली.
