प्रतिनिधी, औरंगाबाद : आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटना वर्धा जिल्हा बैठक १६ जुलै रोजी आयटक कामगार केंद्र वर्धा येथे ज्योषणा राउत यांच्या अध्यक्षतेखाली आयटक राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे, राज्य सचिव सुजाता भगत शबाना शेख जिल्हा सचिव प्रतिभा वाघमारे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.वर्धा जिल्ह्यात १०३३ आशा वर्कर ,५४ गटप्रवर्तक आहे गेल्या चार महिन्या पासून आशांना कामाचा मोबदला तर गट प्रवर्तकांना मानधन मिळालेले नाहीत त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांत संताप पसरलेला आहे.कोविड लसीकरणात उत्तम काम करुन आरोग्य विभागाला मदत केली आहे अश असताना सुध्दा आशा वर्कर वर उपासमारीची वेळ आली असून तात्काळ राज्य प्रशासनाने (आरोग्य विभाग) निधी दिला नाहीतर २५ जुलै २०२२ रोजी रास्तारोको / जेलभरो करण्याचा निर्णय घेण्यात आला.आयटकचे राज्य उपाध्यक्ष काँ दिलीप उटाणे राज्य प्रशासना सोबत १८ जुलै रोजी बैठक करुन थकीत मानधना बाबत चर्चा करतील यावरुनही मानधनासाठी निधी मिळाला नाहीतर २५ जुलै रोजी प्रचंड स्वरुपाचा आंदोलन करुन जेलभरो करतील अशा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
