प्रतिनिधी, जळगाव : भूषण नामदेव पाटील तालुका भडगाव येथील या तरुणाने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांचे निर्देशनास आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून आत्मदहनासाठी आणलेले पेट्रोल आगपेटी जप्त करण्यात आली. यावेळी आत्मदहन करणाऱ्या तरुणाने पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, मी अनेकदा भडगाव येथील बस स्टॅन्डला लागून असलेल्या अतिक्रमण विषयी ग्रामसेवक, मुख्याधिकारी, अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून त्यांच्याकडून ही अरेरावीची भाषा वापरण्यात आली. शासनाला वारंवार सूचना देऊन देखील त्या तक्रारी कडे दुर्लक्ष केल्यामुळे आज सामान्य माणसाच्या जीव गेला असता त्याठिकाणी पोलीस कर्मचारी नसते तर … मात्र तरुण आज आत्मदहन करण्याचा निर्णयावर ठाम असल्याचे ही सांगण्यात आले आहे.
