प्रतिनिधी , पुणे : पुण्यातल्या एम जी रोड वर असणाऱ्या atm मध्ये स्कीमर लावण्यात आला होता याचा पर्दा पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी केला आहे .एम जी रोड वर असलेल्या एका नामांकित बॅंकच्या atm मध्ये अस स्कीमर बसल्याची शंका बँकेला आली आणि त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली ,माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक कदम तपासणीसाठी बँकेत गेले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला atm मध्ये स्कीमर लावणारा व्यक्ती हेल्मेट घालून आला होता .मात्र हे स्कीमर लावून तो गेला मात्र तेवढया वेळेत atm मध्ये कोणी आलं नाही म्हणूण मोठं धोका टाळला ,आशा पद्धतीने अनेक atm मध्ये स्कीमर लावून लुटण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत .पुणे लष्कर पोलीस निरीक्षक यांनी हे स्कीमर कस लावले जाते याबाबत एक व्हिडिओ व्हायरल केला आहे .atm मध्ये स्कीमर लावणारा चोर कशा पद्धतीने हे सगळं करत आहे ते सीसीटीव्ही मध्ये कैद झाल आहे .
