प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद, शहरात सर्वच मंडळांनी यंदा जय्यत तयारी केली आहे. शहरात काही वैशिष्ट्यपूर्ण असे मंडळ आहेत. त्यातील एक म्हणजे कुवारफल्लीचा जागृत गणेश मंडळ. या गणपती बाप्पाच वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे बाप्पाची स्थापना होत असताना मूर्ती काराच्या घरातून मूर्ती हलली नव्हती. रोशन गेट येथे कुंभार मूर्तीला आकार देत मूर्ती ही 13 फुटाच्यावर झाली, 5 सप्टेंबर 1981 ला स्थापना झालेली आहे. वीर गणेश मंडळांने ही मूर्ती स्थापन केलेली आहे. ही मूर्ती साडेतेरा फुटाची आहे. त्या मूर्तीचे वजन एक टन झाल्यामुळे ती मूर्ती जागची हलेना त्यामुळे गणपतीला कौल द्यावा लागला तेव्हा ती मूर्ती येथे आणून स्थापन करण्यात आली. आज या गणपतीला स्थापन करून चाळीस वर्षाच्या वर झाले आहे. जिल्ह्यातील सर्वात पहिली मूर्ती आहे अशी माहिती मंडळ विश्वस्तांनी दिली. शहरातील दुसरा मोठा गणपती म्हणजे दिवाण देवडी येथील पावन गणेश मंडळ यांनी स्थापन केलेला येथे गणपती स्थापन करून तीस वर्षे झालेले आहे. या मूर्तीचेही वजन जास्त असल्यामुळे ही मूर्तीचे विसर्जन करता आली नाही. महाराष्ट्रामध्ये अशी मूर्ती कोणी बनवली नाही आणि 21 फुटाच्या मूर्तीचे कोणाचे मंदिर नाही. हे स्वरूप जे आहे ते बालस्वरूपामध्ये हा गणपती दिसतो. याचे वैशिष्ट्य आहे आणि नवसाला पावणारा आहे असे अध्यक्ष नरवडे पाटील यांनी सांगितला आहे. चौराहा मध्ये 1994 मध्ये गणेशाची मूर्ती स्थापन झालेली आहे. शहरातील ही तिसरी मोठी मूर्ती आहे. या मूर्तीची उंची 23 फूट असून डोळे जे या गणपतीचे आहे ते कोरलेले आहे त्यामुळे साक्षात डोळे असल्याचे भास होतात, असं सागर ठाकूर यांनी सांगितले.
