प्रतिनिधी , सांगली : अयोध्येतील सुरू असलेल्या भव्य राम मंदिराचे काम 2024 च्या जानेवारीत पूर्ण होणार असल्याची माहिती अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांनी सांगलीत व्यक्त केले. ते सांगलीत सुरू असलेल्या श्री रामकथा व नाम संकीर्तन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते , तेव्हा ते बोलत होते. हजारो सांगलीकरांनी या कीर्तन सोहळ्यास हजेरी लावली होती.
