जनतेज न्युज

बाळासाहेब ठाकरें सारखा मोठेपणा नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात नाही – प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी , अकोला : दाडू इंदुरीकरांच गाडवाच लग्न. हे नाटक बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिल्यावर बाळासाहेबांचा मोठेपणा दिसून आला. तो मोठेपणा मोदीं आणी शरद पवार यांच्या मध्ये नाही.असा टोला प्रकाश आंबेडकरांनी मोदी आणि पवारांना लगावला आहे.तर राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा दाखवण्याचं जे मोठेपण बाळासाहेब ठाकरेंमध्ये होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आणी शरद पवार मध्ये नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.ते आज भारतीय बौद्ध महासभेनं घेतलेल्या 38 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मेळाव्याचे प्रमुख वक्ते होते.तर अकोला क्रिकेट क्लबवर झालेल्या मैदानावर भर पावसात प्रकाश आंबेडकरांनी सभा घेतली. असून या सभेला भरपावसातही लोकांनी गर्दी केली होती.