जनतेज न्युज

बाळासाहेबांचे विचार जे जपतात ती खरी शिवसेना – मंत्री दीपक केसरकर

प्रतिनिधी, पुणे : पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच जबरदस्त स्वागत झालं.  कॅबिनेटचि सामूहिक जबाबदारी असते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना , त्या जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक करून सातारा, कोल्हापूर , सिंधुदुर्गला पण आम्ही जाणारा आहोत. आज पुण्यात चंद्रकांतदादा, छत्रपती उदयनराजे यांना भेटतोय. आज शिर्डी ला गेलो होतो, शिर्डी मध्ये क्राईम कमी करायचा प्रयत्न सुरू आहे.  गृहमंत्री कार्यभार दिल्यानंतर हे सगळं त्याच्या कानावर घालणार आहे . लवकरच खाते दिली जातील .  पहिल्या टप्प्यात अनेकजण मंत्रीपद सोडून आले आहे . आम्ही सगळे गेलो तेव्हा 7 मंत्री होते. मनाचा मोठेपणा थोडा पहिल्या टप्प्यात दाखवावा लागतो.  दोन अपक्ष मंत्री होते, पण एकाला घेतलं असत तर दुसऱ्याला नाराज करावं लागलं असत, मात्र बच्चू कडू याचा योग्य मान राखला जाईल कलंकित मंत्री हा आरोप एक वर्षांपूर्वी संजय राठोड यांच्यावर करण्यात आला होता तो आरोप सिद्ध झाला नाही, एका समाजाचा मंत्रीपद द्यावे म्हणून बंजारा समाजाला दिलेले वचन मुख्यमंत्री यांनी पाळल, याची चौकशी अजुन सुरू आहे. असे दीपक केसरकर यांनी म्हटले.  चित्रा वाघ म्हणत असतील तर चौकशी होईल चौकशी निःपक्षपाती पणे होईल, परंतु जर दोषी नसतील तर मंत्री का देऊ नये, तात्कालिन मुख्यमंत्री यांनी त्यांना वचन देऊन मंत्रिपद दिलं नाही, त्याचा दोष आढळला तर कारवाई झाली असती, महिलांच्या बाबतीत आम्ही न्याय देण्यासाठी आहोत .  उठाव करायला धैर्य लागत, सगळे आमदार आले असते. आरेमध्ये पैश्याचा अपव्यय झाला , अश्या गोष्टीमुळे असे प्रकल्प रखडले तर नुकसान होत, सुप्रीम कोर्टाने याबाबत ची परवानगी दिली होती, शेवटी पर्यावरण रक्षण झालं पाहिजे . सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं जातं आहे. आपण नेहमी हे विचारता, की मी उद्धवसाहेब यांच्याबाबत मी काहीच बोलत नाही, नि काही बोललो तर लगेच टायटल होत मी उद्धवसाहेब यांच्यावर टीका केली अस होत ते मला नको आहे . नाना पटोले  यांनी एक शद्ब वापरला तो म्हणजे ही अनैसर्गिक युति होती जे आम्ही म्हणत होतो त्याला पुष्टी मिळाली. आम्हला 200 जागा येतील आमची युती आहे , असे दीपक केसरकर यांनी मुलाखतीत म्हंटलं.   पंकजा मुंडे यांच्यापुढे मोठं भविष्य, वय आहे.  काम करत राहावं लागतं.  त्यांनी थोडी सबुरी पाळली पाहिजे. त्यांना योग्य सन्मान मिळेल.  18 मंत्री घेतले विस्तार झाला की महिलांनाही सन्मान मिळेल.  मंत्रिमंडळात कर्तबगार मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री लाभले आहेत , असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले.