मटकेवाले, जुगार अड्डे, वेश्याव्यवसाय, अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना कारवाई तर झालीच पाहिजे
जुगार अड्डे, वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना, थर्ड डिग्री दिलीच पाहिजे. खाजगी वृत्तवाहिन्यांनी जबाबदारीचे भान ठेवून आमच्या पुणे विषयी वृत्तांकन करावे…..
पुणे , प्रतिनिधी : पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांच्याविषयीचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल काय झाला असून याविषयी प्रसार माध्यमातून उलट सुलट बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. खरतर या पाठीमागचा हे काय आहे पण समजून घेणे आवश्यक आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाची धडक कारवाई
32 पोलिस स्टेशन हद्दीत साडे पाच महिन्यात 684 आरोपीसह दहा कोटी 34 लाखांचा मुद्देमाल जप्त.
पुणे शहरातील 32 पोलीस स्टेशन, एक डझन गुन्हे शाखा, त्यातील 250 अधिकारी काय हातावर हात धरून बसले असताना एकट्या राजेश पुराणिक यांनी मागील वर्षातील रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करून दाखवली आहे.
जुगार अड्डे चा लवणारे , वेश्या व्यवसाय चालवणारे अमली पदार्थ विक्री करणारे यासह सर्व प्रकारचे अवैद्य धंदे करणारे एकट्या राजेश पुराणिक यांनाच दिसले…..? ते पुणे पोलीस आयुक्तालयातील बत्तीसी यांना का दिसले नाही बरे….
पुणे शहर पोलिसांविषयी नाहक बदनामी कारक बातम्या प्रसारित करून राजेश पुराणिक आन्ना त्यांच्या कर्तव्यापासून अडवण्याचा प्रयत्न पुणेकर नागरिक हाणून पडतील.
पुणे शहर पोलीस आयुक्तालय येथील ज्या पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्डे, वेश्याव्यवसाय यासह बेकायदेशीर अवैध धंदे सुरु असतील त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा व संबंधित अवैद्य धंदे करणाऱ्यांना तडीपार करण्याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी राणा भीमा देवी थाटात घोषणा केली होती. मागील साडेपाच महिन्यात राजेश पुराणिक यांनी 32 पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करून अवैध धंदे सुरू असल्याचे दाखवून दिले आहे. मग आयुक्त कारवाई का करीत नाहीत.
राजेश पुराणिक यांच्या बदनामी मागे आरोपी, गुन्हेगार कमी, पण खात्यातील काही वळू, काही टोंगे, असल्याचे वायरल व्हिडिओ वरून दिसून येत आहे. क्रमशः
