प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाला तिरंगा रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या रोषणाईमुळे भारतीय तिरंगा झेंड्यांच्या रंगात महापालिका मुख्यालयाची इमारतीवर तिरंग्याच्या तीन रंगांची छटा पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे क्षण पाहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे आणि लोक येऊन सेल्फी घेत आहे.
