जनतेज न्युज

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जल्लोषात स्वागत

प्रतिनिधी, चंद्रपूर : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आज पहिल्यांदाच चंद्रपुरात दाखल झाले. त्यांच्या प्रथम आगमनाला कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत केले. चंद्रपुरात पोचताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करीत प्रमुख मार्गाने त्यांची मिरवणूक काढली. रस्त्यात जागोजागी गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना न्याय आणि आरोग्य सेवा उत्तम करणे, ही आपली प्राथमिकता राहील, असे मुनगंटीवार यांनी सांगितले